महाविकास आघाडी फूटणार? म्हणणाऱ्यांचा अजित पवार यांच्याकडून खरपूस समाचार; म्हणाले,
या तिन्ही पक्षात कधीच एकमत होणार नाही. त्यामुळे ही आघाडी राहणार नाही. ते मोठा भाऊ छोटा भाऊ या प्रकरणानंतर यांच्यात असं होणार होतं अशा एक ना अनेक टीका मविआवर करण्यात येत होत्या.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीतमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर या तिन्ही पक्षात कधीच एकमत होणार नाही. त्यामुळे ही आघाडी राहणार नाही. ते मोठा भाऊ छोटा भाऊ या प्रकरणानंतर यांच्यात असं होणार होतं अशा एक ना अनेक टीका मविआवर करण्यात येत होत्या. यासर्व टीकांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी मविआही 100 टक्के एकजूट राहणार आहे. एकजूट रहावी अशी आमची भूमिका आहे. मविआ कायम राहणारच. त्यामुळे मनात शंका असेल तर स्टॅम्प पेपर द्या त्यावर मी लिहून देतो. तर त्यावर मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याही सह्या ही घेतो असा टोला लगावला आहे. तर जागा वाटपासंदर्भात मविआमध्ये वेगवेगळी मत आहेत. पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.