“उद्या भोंगा बंद करणार”, शिवसेना नेत्यानं संजय राऊत यांना थेट अंगावरच घेतलं; दिले कसले संकेत

| Updated on: May 31, 2023 | 7:54 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा 19 जागांचा आकडा कायम राहील. कदाचित त्याहून अधिक जागांवर आम्ही निवडणूक लढवू, असे म्हटले आहे. त्यावरून सध्या टीका होताना दिसत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक ही अवघ्या 1वर्षावर आली आहे. मात्र त्याआधीच जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटात आतापासूनच धुसफूस सुरू झालेली दिसत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा 19 जागांचा आकडा कायम राहील. कदाचित त्याहून अधिक जागांवर आम्ही निवडणूक लढवू, असे म्हटले आहे. त्यावरून सध्या टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर निशाना साधताना राऊत यांना बाळासाहेब भवनात पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, राऊतांचा भोंगा बंद होईल करू तर त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचेही म्हटलं आहे. तर आता राऊत याचं बोलणं बस्स झालं, या राऊतांचा भोंगा बंद नाही झाला तर नावाचा संजय शिरसाट नाही असेही ते म्हणाले.

 

Published on: May 31, 2023 07:54 AM
देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी, नेमकं कारण काय? पाहा हा स्पेशल रिपोर्ट… VIDEO
बापरे ! चादर हातात यावी, तसा डांबरी रस्ता हातात आला अन्…