एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते; शरद पवार यांचे मविआवर वक्तव्य नक्की काय सुचवायचं आहे?
पवार यांनी मविआवर बोलताना, एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे.
अमरावती : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे अख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही लक्ष वेधलं गेलं आहे. पवार यांनी मविआवर बोलताना, एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेली महाविकास आघाडी हा येत्या निवडणुकीत राहणार की नाही असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तर येणाऱ्या निवडणुकीत मविआ येत्या निवडणुकीत आताच कसं सांगू म्हणत त्यांनी गुगली टाकली आहे.
Published on: Apr 24, 2023 08:20 AM