शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतच कलह? ‘या राष्ट्रवादी नेत्या’ने खासदारकी लढवण्याचे दिले संकेत
राज्यातील भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडितील तिन्ही पक्ष कामाला लागले आहे. जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये चर्चा आणि बैठकांना उत आला आहे. तर युती आणि आगाडीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे.
पिंपरी : लोकसभा निवडणूक ही आता जवळ येत आहे. 1 वर्षभरात खासदारकिची निवडणूक जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यावरून राज्यातील भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडितील तिन्ही पक्ष कामाला लागले आहे. जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये चर्चा आणि बैठकांना उत आला आहे. तर युती आणि आगाडीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. पक्षबांधणीसह नव्या जुन्या उमेदवारांना मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. याचदरम्या शिरूर मतदारसंघात बैठकीपूर्वीच ट्विस्ट आला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार विलास लांडे यांनी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरुर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर लागेल आहेत. ज्यावर भावी खासदार असा उल्लेख आणि संसदेचा फोटोही पाहायला मिळतोय.