शिंदे गटाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला… ‘भाजप त्यांना’
एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला असून भाजप 26 जागांवर निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जागा वाटपावरून भाजप-शिंदे गटावर निशाना साधला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. तर भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला असून भाजप 26 जागांवर निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जागा वाटपावरून भाजप-शिंदे गटावर निशाना साधला आहे. त्यांनी, शिवसेनेतील 13 बंडखोर खासदार जाऊन शिंदे गटाला मिळालेले आहेत. त्यामुळे 22 चा प्रश्नच येत नसल्याचे म्हटलं आहे. तर आत्तापासूनच शिंदे गट आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप यांना किती जागा हे आता बघावं लागणार आहे. तर भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार हे कोणीच निवडून येणार नाहीत त्यामुळे भाजप शिंदे गटाला जागा कशाला सोडतील? असाही टोला त्यांनी लगावला आहे. याबाबतचा सर्वे भाजपने केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीपर्यंत शिंदे गटाचे सर्व साफ होणार असल्याचे देखील खैरे यांनी म्हटलं आहे.