मविआ बैठकांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा टोला; म्हणाला, किती ही बैठका घ्या… पण, सरकार हे…
काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर राज्यात या हालचालींना वेग आला आहे. तर कर्नाटकमध्ये जो बदल झाला तो राज्यात पहायला मिळेल. पण त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होत.
पुणे : देशात होणार्या आगामी 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सध्या बैठकाचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर राज्यात या हालचालींना वेग आला आहे. तर कर्नाटकमध्ये जो बदल झाला तो राज्यात पहायला मिळेल. पण त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होत. त्यानंतर या बैठका आता मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर होताना दिसत आहेत. त्यावरून भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. तसेच 2024 च्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानवे यांनी, महाविकास आघाडीच्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर बोलताना, त्यांच्या बैठका होऊ द्या. त्यांचे दौरे होऊ उद्या. पण 2024 च्या निवडणुकीत ठरलेलं आहे तेच होईल. या राज्यात आणि देशात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार. त्यामुळे त्यांच्या किती बैठका झाल्यातरी आम्हाला काय फरक पडत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.