नितीन गडकरी यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

| Updated on: Jun 09, 2024 | 8:49 PM

नरेंद्र मोदी यांनी अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्यात टाळ्यांच्या गजरात त्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातून सहा जणांनी शपथ घेतली आहे. त्यात भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नितीन गडकरी हे संघातील अतिशय जवळचे आहेत.त्यांना नरेंद्र मोदी यांचा स्पर्धक मानले जाते. नागपूर येथून ते लोकसभेवर निवडून आले आहेत. नितीन गडकरी यांच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी गेल्या दोन टर्ममध्ये देण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांचा सर्वच पक्षात मित्रमंडळींचा गोतावळा आहे. भाजपाने यंदा लोकसभा 2024 च्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव घेतले नव्हते तेव्हा विरोधकांनी विशेष उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. नितीन गडकरी यांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली होती.

Published on: Jun 09, 2024 08:48 PM
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की…,’ प्रचंड टाळ्यांच्या गजरात एनडीएचे तिसऱ्यांदा सत्तारोहण
मोदींच्या सर्वात विश्वासू पियूष गोयल यांनी घेतली मंत्री पदाची शपथ