Pandharpur : खोतांना बिल मागणारा कोण निघाला एकदा बघाच..!
कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
पंढरपूर : तीन महिन्यापूर्वी भररस्त्यामध्ये एका हॉटेलचालकाने (Sadabhau Khot) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना जेवणाचे (Hotel Bill) बिल मागितल्याचा (Video Viral) व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतर सदाभाऊ खोत यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. तीन महिन्यापूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्याशी हॉटेल मालक अशोक शिनगारे चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
Published on: Sep 13, 2022 08:49 PM