आली पुन्हा संधी! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुन्हा लॉटरी; जाणून घ्या कधी निघणार सोडत
काही दिवसांपुर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी सोडत निघाली होती. यात अनेकांच्या मुंबईतील घराचे स्वप्न पुर्ण झाले होते. तर काहींच्या पदरी निराशा आली होती.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संधेलाच मुंबईकर होण्याचे अनेकांचे स्वप्न हे पुर्ण झाले होते. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीत अनेकांना घरांची लॉटरी लागली होती. पण यावेळी अनेकांच्या पदरात निराशा आली होती. मात्र आता आशांसाठी पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. तर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त लागला असून साडेचार हजाप हून अधिक घरांसाठी सोडत निघणार आहे. तर या साडेचार हजाप हून अधिक घरांसाठी ११ सप्टेंबर रोजी सोडतिची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. तर घरांसाठी २६ ऑक्टोबरला सोडत निघणार आहे.
Published on: Aug 23, 2023 10:56 AM