‘त्यांची’ नावं घेऊन आमची सकाळ खराब करू नका!; श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा

| Updated on: Apr 09, 2023 | 8:05 AM

MP Shrikant Shinde : आधीच्या आणि आताच्या अयोध्या दौऱ्यात काय फरक? श्रीकांत शिंदे यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. याआधीच्या दौऱ्यापेक्षा यंदाच्या दौऱ्यात अधिक उत्साह आहे, असं श्रीकांस शिंदे म्हणाले आहेत.

लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, आमदार, खासदारांसह अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सकाळचे 6 वाजतायेत. त्यांची नावं घेऊन आमची सकाळ खराब करू नका, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. काही लोक सकाळ-दुपार-संध्याकाळी फक्त टीकाच करत असतात. पण मला दिवसाची सुरूवात करायची नाही. आम्ही इथं दर्शनासाठी आलो आहोत. चांगल्या कामासाठी आलो आहोत. त्यामुळे टीकाकारांवर न बोललंच बरं, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Published on: Apr 09, 2023 08:05 AM
साई भक्तांना आणखी एक मोठं गिफ्ट! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….
‘या’ कारणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा; सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य