मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, पण…; उदय सामंत यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला खूप महत्व आहे. पाहणी, आरती सगळे कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने आखले आहेत. हा दौरा असताना काळा डाग लागावा, असं काहीजण प्रयत्न करत आहेत. पण हा दौरा ऐतिहासिक होणार आहे, असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
अयोध्या : मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं कामं सुरु आहे. पण एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ना भूतो ना भविष्याती असा हा दौरा होणार आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची त्याची तयारी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी काम करत आहेत. शिवसेनेच्या तिन्ही दौऱ्यांचा मी साक्षीदार आहे. पण हा दौरा वेगळा आहे. सगळे सज्ज झाले आहेत त्यांच्या स्वागतासाठी झाले आहेत. एक वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे. समस्त देशाचे लोक दखल घेतील असा हा दौरा होणार आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
Published on: Apr 08, 2023 03:48 PM