पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची झलक….
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. तब्बल ६० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आलेले मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.
Published on: Mar 06, 2022 12:47 PM