चंद्रकांत पाटलांच्या पुढाकार वक्तव्यावर; आव्हाडांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 07, 2023 | 2:33 PM

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यासाठी जर आपल्याला वरून आदेश आला तर आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले होते

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाण्यात एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी 40 आमदार आपल्याबरोबर घेत बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आणले. त्यानंतर राज्यात सतत खोके आणि हिंदुत्वावरून टीका होताना दिसत आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यासाठी जर आपल्याला वरून आदेश आला तर आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले होते. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. जर शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करून, चांगल्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. ‘ऑल दि बेस्ट’ असही ते म्हणाले.

Published on: Apr 07, 2023 02:33 PM
रोशनी शिंदे प्रकरणावरून आव्हाडांचा शिंदे, फडणवीस सरकारला इशारा; मी, त्यांच्या पाठिशी
साधा कार्यकर्ताही पाडू शकतो, लोकांमधून किती निवडणुका निवडून आलात? नवनीत राणांचा राऊतांना थेट सवाल