पराभव झाला,पण ‘रन रेट’ वाढत आहे,पुढल्या वेळी तर थेट येथूनच उभा राहतो,’ जानकर यांनी कोणाला दिले आव्हान

| Updated on: Jul 06, 2024 | 9:28 PM

शरद पवार यांनी डोक्यावर हात ठेवताच महादेव जानकर यांना पटकण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ओढून घेतले आणि महाविकास आघाडीत जाता...जाता...महादेव जानकर महायुतीत गेले, आता तर त्यांनी नवीन आव्हान दिले आहे.

Follow us on

परभणी लोकसभा मतदार संघातून यंदा महायुतीने पाठिंबा दिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीला झुलवत ठेवत अचानक महायुतीच्या बाजूला गेल्याने शरद पवार यांनाही धक्का बसला आहे. त्यांचा अखेर परभणीत उबाठाचे उमेदवार संजय जाधव यांनी पराभव केला आहे. मुस्लीम मोदींच्या विरोधात, दलित घटना बदलणार म्हणून विरोधात तरीही 16 दिवसात आपल्याला 4 लाख 67 हजार मते मिळाली आहेत. मी खासदार होणार आहे काही काळजी करु नका, पुढच्या वेळी तर बारामतीची तयारी चाललीय माझी, बारामतीत उभा राहणार आहे असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा निवडणूका मी लढल्या आहेत. नांदेड, सांगली, माढा, बारामती आणि परभणी पाचही निवडणूकात माझा पराभव झाला तरी मतदान माझे लाखांनी वाढत चालले आहे. कमी होत नाहीए, ‘रन रेट’ माझा वाढत चालला आहे. पक्षाला मान्यता मिळत चालली आहे. विधान सभेत आमदार आहे. विधान परिषदेत आमदार आहे. विदर्भात आम्ही कमी पडत आहोत. विदर्भात फक्त बडनेरा आणि गडचिरोली जिल्हा परिषदेत आमचे सदस्य आलेत. बडनेरात एक पंचायत समिती सदस्य आहे आणि गडचिरोलीत सात जिल्हा परिषद समिती सदस्य आणलेत.जिल्हा बँकेचा अध्यक्ष देखील आपल्याच पक्षाचा आहे. अमरावती, अकोला, वाशीम,बुलढाणा तिथे आपलं खातं झिरो आहे, कमी पडतोय, असेही जानकर म्हणाले.