शरद पवार यांची भेट घेतली का ? काय म्हणाले महादेव जानकर

| Updated on: Mar 15, 2024 | 4:45 PM

लोकसभा निवडणूकांच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. इच्छुकांनी त्यामुळे भेटीगाठी सुरु केल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. याबाबत त्यांनीच सांगितले की आपण देशोन्नतीच्या संपादकांना भेटायला गेलो होतो. त्याच इमारती शरद पवार होते हे माहीत नव्हते...

परभणी | 15 मार्च 2024 : लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा काही तासांनी जाहीर होणार आहेत, त्यामुळे इच्छुकांनी भेटगाठी सुरु केलेल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. स्वत: मात्र त्यांनी आपण यशवंतराव चव्हाण सेंटर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील देशोन्नतीच्या संपादकांना भेटायला गेलो होतो. तेथे पाचव्या मजल्यावर शरद पवार होते हे मला माहीती नव्हते. महाविकास आघाडीत शरद पवारांशी शिवाय कोणाशी आपली बोलणी झालेली नाहीत. त्यांनी माढाची जागा लढविण्याविषयी विचारले आहे. महाविकास आघाडी परभणीची जागा द्यायला तयार नाही. आणि महायुतीचा माढाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे माढा आणि परभणी अशा दोन्ही ठिकाणांवरुन आपण निवडणूक अर्ज भरणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 15, 2024 04:44 PM
Video | पुण्यात आपलाच हातोडा चालणार, वसंत मोरे यांना आत्मविश्वास
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे यांचा अजित पवार विरोधी राग कायम, निवडणूक लढण्यावर ठाम