“पंकजांना जास्त त्रास होईल तेव्हा…”, महादेव जानकार यांचा नेमका इशारा कोणाला?

| Updated on: Jul 23, 2023 | 10:30 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात रंगत असतात. मात्र आपण भाजपमध्येच राहणार असं त्या वारंवार सांगतात. याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर, 23 जुलै 2023 | भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात रंगत असतात. मात्र आपण भाजपमध्येच राहणार असं त्या वारंवार सांगतात. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय सचिव आहेत. मात्र राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय करायचं ते तेव्हा मी ठरवेल. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे आता मी फक्त तिला दिल्या घरी सुखी रहा असेच म्हणेल. मात्र जेव्हा पंकजा मुंडे यांना खूप त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन मी तिला आणायला जाईल. जानकर यांच्या या विधानाने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

‘त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती’; संजय राऊत यांचा रोखठोकमधून राष्ट्रवादीवर निशाना
भुसावळकरांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा