सभासदांनी त्यांचे कंडके केले, धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यांवर टीका
दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या गेल्या आणि काल निवडणुकीचा (Election) निकाल हाती आला. यावेळी सभासदांनी महाडिक यांना कौल दिल्याचे उघड झाले. त्यामुळे महाडिक गटात अतिशय उत्साह दिसत होता.
कोल्हापूर : जिल्ह्यातील महाडिक आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटातील वाद हा कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Rajaram Sugar Factory) निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या गेल्या आणि काल निवडणुकीचा (Election) निकाल हाती आला. यावेळी सभासदांनी महाडिक यांना कौल दिल्याचे उघड झाले. त्यामुळे महाडिक गटात अतिशय उत्साह दिसत होता. यानंतर महाडिक गटाकडून आमदार सतेज पाटील यांना डिवचत टीका करण्यात आली. त्याला सतेज पाटील यांच्याकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं. यावेळी सभासदांनी बंटी पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांचे कंडके पाडले. सभासदांनी त्यांची झिडकारलं आहे. सभासदांनी त्यांचे कंडके केले. विरोधकांनी विखारी प्रचार केला. पण महाडिकांना गुलाल हा सभासदानिंच लावला. सतेज पाटील यांची उतरती कळा सुरू झाली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. त्यावर आपल्याला उतरली कळा लागली की नाही हे जनताच ठरवेल असा टोला सतेज पाटील यांनी लगावला आहे.