MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 June 2021
अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात स्वबळावरुन निवडणूक लढवण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काँग्रेसने आगामी काळात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (19 जून) शिवसेनेच्या वर्धापन दिनीनिमित्त बोलताना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे काँग्रेसबाबत असं बोलल्याचं स्पष्ट झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असं म्हणत त्यांनी दंड थोपटले