MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 June 2021
सर्व विरोधक राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार आता मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. दु
भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आज राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केली. त्यानंतर पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
Published on: Jun 22, 2021 08:29 AM