MahaFast News 100 | संप मिटला, कर्मचारी कामावरून हजर होणार

| Updated on: Mar 21, 2023 | 8:44 AM

संप मिटल्याने सरकारी कर्मचारी आजपासून कामावरून हजर होणार. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून येणार कोलमडलेली व्यवस्था रुळावर येणार आहे

महाफास्ट न्यूज 100 | शासकीय, नियम शासकीय कर्मचाऱ्यांचा संपातून माघार घेतल्याची घोषणा. मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात लवकरात लवकर अहवाल सादर करून उचित निर्णय घेण्याचे आश्वासन. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकार सकारात्मक जुन्या पेन्शनबाबत समिती तीन महिन्यात अहवाल देणार. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने सरकारकडून कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. तर संप मिटल्याने सरकारी कर्मचारी आजपासून कामावरून हजर होणार. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून येणार कोलमडलेली व्यवस्था रुळावर येणार आहे. तर अमरावतीत सरकारी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांना मध्यवर्ती कर्मचारी संघटनांनी घेतलेला निर्णय अमान्य. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भूसे यांच्यावर गिरणा अॅग्रोच्या नावाने फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.

शेतकऱ्यांकडून १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स गोळा केले. मात्र वेबसाईटवर एक कोटी 67 लाख शेअर्स गोळा केल्याची माहिती असल्याचा उल्लेख. उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात हल्ली संजय राऊत यांची छाप दिसते अशी टीका शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची भाषा बोलू नये असा टोला देखिल त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Mar 21, 2023 08:44 AM
ठाण्यासह मुंबईत अवकाळीची हजेरी, गरमीत गारव्याचा अनुभव
अवकाळीनंतर आता उन्हाचा चटका