MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |7 AM | 06 August 2022

| Updated on: Aug 06, 2022 | 10:03 AM

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघाला 'फाऊल'चा सामना करावा लागला. वास्तविक, भारतीय गोलकीपर आणि कर्णधार सविता पुनियाने पहिला शूट वाचवला होता, पण टायमर सुरू होऊ शकला नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा तेच शूट करण्याची संधी मिळाली.

भारतीय महिला हॉकी संघाला शुक्रवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी केली. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये 1-0 ने पिछाडीवर गेल्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आणि 49व्या मिनिटाला वंदना कटारियाने 1-1 असा गोल केला. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर भारतीय बचावपटू सज्ज झाले, तर फॉरवर्ड्सने आक्रमणे सुरूच ठेवली. पूर्णवेळ 1-1 अशी बरोबरी राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाल लागला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय संघाला ‘फाऊल’चा सामना करावा लागला. वास्तविक, भारतीय गोलकीपर आणि कर्णधार सविता पुनियाने पहिला शूट वाचवला होता, पण टायमर सुरू होऊ शकला नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा तेच शूट करण्याची संधी मिळाली.

Published on: Aug 06, 2022 10:03 AM
Varsha Raut ED Summons | संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स
Buldana : मेहकरमध्ये महिलेने चोरली सोन्याची पोत, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद