ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन; याबातमी सह पहा महाफास्ट न्यूज 100
अंधेरी पोटनिवडणुकीत आता पुन्हा एकदा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे गट आमने सामने येणार आहे. यावेळी भाजपने देखिल उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं. मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.
अंधेरी पोटनिवडणूकीवरून सुरू झालेला वादंक अखेर संपूष्टात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज आज भरला. यावेळी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी लटकेंसाठी काढण्यात आलेल्या शिवसेनेच्या या रॅलीत मविआचे नेते सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे, अनिल परब आणि काँग्रेसचे भाई जगताप सहभागी झाले होते. अंधेरी पोटनिवडणुकीत आता पुन्हा एकदा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे गट आमने सामने येणार आहे. यावेळी भाजपने देखिल उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं. मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकेर यांची शिवसेना ही रडकी सेना असल्याची टीका अशिष शेलार यांनी केली आहे. कधी न्यायालयात तर कधी निवडणूक आयोगाच्या समोर ते रडत असतात. उद्या ते हारले तर नागरिकांच्या नावाने रडतील असा टोला शेलार यांनी लगावला आहे.