शिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार? याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100
दसरा मेळाव्यावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे. येथे खायचे वांदे झाले आहेत. मेळाव्याला उपाशीपोठी बोलवता काय? असाही सवाल त्यांनी केला आहे.
राज्यातील जनतेला सेनेसह शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता लागली आहे. तर उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या शिवतिर्थावरील दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा अनिल परबांकडून घेण्यात आला. तर शिंदे गटाकडूनही बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर राज्यातील विविध ठिकाणाहून 2 ते 3 लाख लोक मेळाव्याला येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अर्जून खोतकर यांचे हजारो कार्यकर्ते जालन्यातून निघाले आहेत. मात्र यावेळी बंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. दसरा मेळाव्यावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे. येथे खायचे वांदे झाले आहेत. मेळाव्याला उपाशीपोठी बोलवता काय? असाही सवाल त्यांनी केला आहे.
Published on: Oct 04, 2022 07:38 PM