पवार-ठाकरे हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत येणार एकत्र, यासह पहा नव्या अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहे. पवार-ठाकरे हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवेळी एकत्र येतील. त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते राहूल गांधी देखील असणार आहेत.
राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिली. ते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर बोलत होते. याचदरम्यान फडणवीस यांनी मुंबई-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. तसेच मुंबईच्या धारावी पुनर्विकासाचा प्रश्न ही मार्गी लागत असल्याचे सांगताना फडणवीस यांनी रेल्वेची जागा मिळाल्याचेही सांगितले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहे. पवार-ठाकरे हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवेळी एकत्र येतील. त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते राहूल गांधी देखील असणार आहेत. यादरम्यान सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या चौकश विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एसबी कार्यालयावर मोर्चा काढला. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनावरील होणारी सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.