समता पक्षाने याचिका कोर्टाने फेटाळली, यासह पहा नवे अपडेट, नव्या बातम्या महाफास्ट न्यूज 100 मध्ये
ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. त्याबाबत समता पक्षाने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी घराच्या बाहेर लाठ्या-काठ्या आणि दगड, स्टंप आणि बाटल्या आढळून आल्या. याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. तर खालच्या पातळीवर जाऊन जर कोणी टीका करत असेल तर कार्यकर्ते उत्तर देणारच. मात्र जाधव यांच्या घरावर हल्ला कोणी केला याचा तपास पोलिसांनी करावा अले निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यादरम्यान भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या मिमिक्री आणि जहरी टीकेबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यादरम्यान ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. त्याबाबत समता पक्षाने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. तर मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळत होती. त्यामुळे नाराजी दुर करण्यासाठी काही आमदारांची महामंडळांवर वर्णी लावण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचे कळत आहे.