दिवाळी कीट वाटपावरून केसरकर यांनी काय सांगितलं, पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये

| Updated on: Oct 22, 2022 | 7:31 PM

माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे. यावेली वडेट्टीवार यांनी, 100 रूपयाचे कीट देऊन सण साजरे करता येत नाहीत. सण साजरे करण्यासाठी महागाई कमी करा असे म्हटलं आहे.

राज्य शासनाच्या दिवाळी कीट वाटपाचा राज्यभरात बोजारा उडाला आहे. कोठे शिधा पोहचलेली नाही. तर कुठे काही साहीत्य आहे आणि काही नाही अशी अवस्था दिवाळी कीटची आहे. तर कुठे रेशन धान्य दुकानातील मशीन नेटवर्क नसल्याने किंवा बंद पडल्याने शिधा वाटपात अडचणी येत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेथे मशीनमध्ये अडचणी येत असतील तेथे थेट रेशन कार्ड बघून शिधा वाटण्याचे आदेश दिल्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तर 100 रूपयात देण्यात येणाऱ्या शिधा कीट उपक्रमात लक्ष देण्याची गरज आहे असं विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पवार यांनी यावेळी या शिधा कीट वाटपाचा काळाबाजार होत असल्याचा आरप देखिल पवार यांनी केला आहे. तर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे. यावेली वडेट्टीवार यांनी, 100 रूपयाचे कीट देऊन सण साजरे करता येत नाहीत. सण साजरे करण्यासाठी महागाई कमी करा असे म्हटलं आहे. यादरम्यान भाजपची मुलूख मैदान तोफ गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला निशाणा करताना, लवकरच मुंबई आणि बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर लवकरच भाजपचा झेंडा फडणार असं म्हटलं आहे. तसेच पडळकर यांनी राष्ट्रवादीचे 90 टक्के लोक भाजपमध्ये येतील असा दावा ही पडळकर यांनी केला आहे.

 

Published on: Oct 22, 2022 07:31 PM
दिवाळी, दिवाळी खरेदी काय आहे राज्यात स्थिती पहा नव्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये
शिवसेना नेत्या शिंदेंच्या भेटीला, पहा कोण गेलं? 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये