MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 03 October 2022 -TV9

| Updated on: Oct 03, 2022 | 12:49 PM

औरंगाबाद येथे एकमेकांवर टीका करणारे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकाच व्यासपीठावर आले होते.

इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी समोर आली आहे. त्यानंतर महाविमान कंपनीच्या त्या विमानाला भारतात लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक वेळा टीका होताना दिसली आहे. मात्र यादरम्यान औरंगाबाद येथे एकमेकांवर टीका करणारे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी या दोघांच्यात हसत खेळत चर्चा झाली. ज्यामुळे उपस्थित अवनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर मंत्री गिरीष महाजन यांनी केलेला गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावला आहे. तर अमित शाहांच्या भेटीबाबत महाजन यांच्यासोबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट केल्याचेही खडसे यांनी म्हटलं आहे.

Published on: Oct 03, 2022 12:49 PM
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 03 October 2022 -TV9
….मग पवार शिक्षण संस्था नाव द्या की..उदयनराजे का खवळले?