“उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कोणतं?”, नितेश राणे यांच्या टीकेवर महंत सुनिल महाराज भडकले
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावर पोहरादेवी येथील ठाकरे गटाचे नेते महंत सुनील महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यवतमाळ : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांचा ‘धर्माभिमानी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.“उद्धव ठाकरेंचा नेमका धर्म कुठला. कारण त्यांनी हिंदू धर्म कधीच सोडलेला आहे. त्यांचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे,” अस नितेश राणे म्हणाले. यावर पोहरादेवी येथील ठाकरे गटाचे नेते महंत सुनील महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील महाराज नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 10, 2023 10:52 AM