देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या 11 कार्यालयांवर ईडीचा छापा; नागपुरातही छापेमारी

| Updated on: Mar 16, 2023 | 11:10 AM

Nagpur Church of North India Office ED Raid : देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात येत आहेत. नागपुरातही छापेमारी करण्यात आली आहे. पाहा...

नागपूर : देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या कार्यालयांवर ईडीकडून छापा टाकण्यात येत आहे. आतापर्यंत चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या 11 कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. नागपुरातही छापेमारी करण्यात आली आहे. नागपुरातीलही चर्चच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकलाय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. बिशप पी शिंग यांनी मिशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शुल्काचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दहा तास या कार्यालयाची झाडाझडती घेतली आहे. नागपूरच्या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती आहे.

Published on: Mar 16, 2023 11:10 AM
4 Minutes 24 Headlines | मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
कर्ज काढून आमदार झालोय, पैशांची गरज, आमची पेन्शन बंद करू नये; शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया