चार हजार स्क्वेअर फूटमध्ये रांगोळी, अकराशे किलो रांगोळीचा वापर; पाहा कुठे साकरली महारांगोळी
देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोश जगभरातील भारतीयांच्यामध्ये दिसून येत असतात वर्ध्यात एक वेगळाच प्रयत्न पाहण्यात आला. येथे एक महारांगोळी साकारण्यात आली असून त्यात विविधतेत एकतेचा संदेश देण्यात आला आहे.
वर्धा : 16 ऑगस्ट 2023 | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त देशात अनेक अनोखे कार्यक्रम केले जात आहेत. तर काल स्वातंत्र्याचा 77 वा स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या काणाकोपऱ्यात ध्वजारोहन आणि विविध कार्यक्रम केले गेले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करताना, मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या 140 कोटी जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या. तर याचदिवशी राज्यातील वर्ध्यातही मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी येथील जिल्हा क्रीडा संकुलात चार हजार स्क्वेअर फूटमध्ये महारांगोळी साकारण्यात आली. याकरिता अकराशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. महारांगोळीत भारताच्या नकाशात सतरा महापुरुषांची चित्रे रेखाटली होती. तर कलावंतांच्या चमूने २२ तासांत महारांगोळी साकारली असून यातून विविधतेत एकतेचा संदेश देण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाअंतर्गत महारांगोळी साकारली आहे.