….त्यामुळे मंत्री गैरहजर राहणारच!; बच्चू कडू यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर
Bacchu Kadu On Ajit Pawar : अधिवेशनादरम्यान राज्य सरकारमधील मंत्री गैरहजर म्हणून अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या टीकेला बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. पाहा...
अमरावती : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान राज्य सरकारमधील मंत्री गैरहजर म्हणून अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी टीकाही केली. त्यांच्या टीकेला बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. “आता मंत्रीच कमी आहेत. त्यामुळे ते गैरहजर राहणारच आहेत. कारण 20 मंत्री आहेत .कमी मंत्री असल्यामुळे होऊ शकते कधी कधी”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या काळातही असं व्हायचं. अजितदादांच्या काळात असंच होतं.सत्ता असली की लोक डोळ्यावर पट्टी बांधून काम करतात. सत्ता नसली की डोळ्यावरील पट्टी काढून काम करायला लागतात, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे.
Published on: Mar 15, 2023 01:35 PM