Special Report | लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार? सामनातून नेमका इशारा कोणाला? एकत्र निवडणुका झाल्यास फायदे-तोटे काय?
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका लागतील, अशी बातमी सामनातून छापून आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांची चाचपणी सुरु केली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास आम्ही तयार आहोत, असं सत्ताधारी शिवसेनेचं म्हणणं आहे आणि भुजबळ यांनीही राष्ट्रवादी तयार असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका लागतील, अशी बातमी सामनातून छापून आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांची चाचपणी सुरु केली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास आम्ही तयार आहोत, असं सत्ताधारी शिवसेनेचं म्हणणं आहे आणि भुजबळ यांनीही राष्ट्रवादी तयार असल्याचं म्हटलं आहे. याआधीही 1999 मध्ये एकत्र निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भाजप, शिवसेनेच्या युतीच्या सरकारला पाडत काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार आलं. केंद्रात मात्र पुन्हा वाजपेयींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएचं सरकार आलं. आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नितेश राणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे, ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन होणार असून घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. वेळेवर जागावाटपाची बोलणी करून तयारी करण्यापेक्षा आधीच जागा वाटून घेत तयारी सुरु करण्याचा मानस मविआचा दिसतोय. त्यातच आता विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील असं ठाकरे गटाला वाटतंय. अर्थात लोकसभेच्या निवडणुकीला दहा महिने बाकी आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका झाल्यास फायदे-तोटे काय? यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…