भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, पहिल्या यादीत मोठे चेहरे?
राज्यात विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात निवडणूकांचा बार उडणार आहे. त्यासाठी विविध पक्षात जागा वाटपाचा तिडा अजूनही सुटलेला नाही. केवळ वंचित बहुजन आघाडीच्या तीन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात आता भाजपाची पहिली 110 उमेदवारांची यादी उद्या सायंकाळी येण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले असून महिनाभराने येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबरला मजमोजणी होणार आहे. राज्यातील विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्याच्या आधी सरकार स्थानापन्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठीची भाजपाची पहिली 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत काही प्रमुख चेहरे पाहायला मिळणार आहेत. उर्वरित जागांवरचा तिडा अजून सुटलेला नाही. पहिल्या यादीत काही जागांवर भाजपाकडून तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत तर काही जागांवर उमेदवार आयात करावा लागणार आहे. तर काही जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपा आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते. भाजपाच्या बैठका होत असून काल देखील भाजपाची कोअर कमिटीची झालेली आहे.पहिली 110 उमेदवारांची यादी उद्या सायंकाळपर्यंत येऊ शकते असे म्हटले जात आहे.