संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान- विधानसभा अध्यक्ष

| Updated on: Mar 01, 2023 | 1:14 PM

"एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे", असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. त्याचे विधिमंडळात पडसाद पाहायला मिळाले.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले? पाहा...

मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात बोलताना एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘चोरमंडळ’ असा शब्द वापरला. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. दोन्ही सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर बोलताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. “सभागृहात उपस्थित करण्यात आलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कामकाजावर प्रतिकूल परिणाम करणारा आहे. राऊत यांचं विधान सभागृहाचा, सभागृहातील सदस्यांचा अन् पर्यायाने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं माझं प्राथमिक मत आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

Published on: Mar 01, 2023 01:14 PM
संजय राऊत स्वत:ला काय समजतात? त्यांना तात्काळ अटक करा; भाजपच्या आमदाराची विधानपरिषदेत मागणी
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप असेल तर मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचीही दखल घ्या; ठाकरेगटाचा पलटवार