Heat Stroke : अग्निवीर जवानाचं स्वप्न भंगलं; उष्माघाताने झाला मृत्यू
अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (वय 21 वर्ष) असे निधन झालेल्या जवानाचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी होते
नाशिक : महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील उष्माघाताची घटना ताजी असतानाच असून या घटनेत 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. अशीच एक धक्कादायक घटना आता नाशिकमधून समोर येत आहे. अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (वय 21 वर्ष) असे निधन झालेल्या जवानाचे नाव असून ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी होते. तर देवळाली कॅम्प येथे प्रशिक्षणा दरम्यान यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे आर्टिलरी रुग्णालयात दोन दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावली. त्यांच्या मृत्यूमुळे ठाकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Published on: Apr 23, 2023 01:14 PM