खारघर श्रीसदस्य मृत्यूप्रकरण, सत्य आलं समोर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब

| Updated on: Apr 20, 2023 | 10:06 AM

खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला आलेल्या 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले.

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात रविवारी झालेल्या दुर्घटनेवर अनेक प्रश्न विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ही दुर्घटना फक्त सरकारच्या निष्काळजीपणा आणि योग्य नियोजन नसल्यानेच झाल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. भर दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला आलेल्या 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. यानंतर आता प्रकरणी नवी बाब समोर आली आहे. श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातून धक्कादायक बाब उघड झाली आहे. मृत्यू झालेल्या श्रीसेवकांध्ये सहा ते सात श्री सदस्यांनी काहीही खाल्लं नव्हतं हे उघड झालं आहे. तर त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

Published on: Apr 20, 2023 10:06 AM
राज्याचा पारा 40 शी पार; उन्हाचे चटके आणि अंगाची लाही लाही
ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सअपचा वापर बंद करा; जीएसटीच्या अधिकाऱ्यांचं अनोखं आंदोलन