Maharashtra Bhushan : आप्पासाहेबांचा हा कार्यक्रम; याचा राजकीय संबंध नाही; आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Apr 16, 2023 | 12:16 PM

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थिती लावली.

खारघर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा ( Maharashtra Bhushan Award ) पार पडत आहे. निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना हा पुरस्कार देण्यात येणार असून याला सत्ताधारी भाजपसह शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थिती लावली.

हा कार्यक्रम आप्पासाहेबांच्या हा पुरस्काराचा कार्यक्रम असल्याने यात राजकारण आणण्याची गरज नाही, असं आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या. तर सर्वश्री सदस्यांना स्वच्छतेचे जे काही धडे दिले, मन स्वच्छ ठेवण्याचं आणि बुद्धी सुद्धा स्वच्छ ठेवण्याची शिकवन परमपूज्य आप्पा यांनी दिली. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात पुढे चालत असल्याचे अनिकेत तटकरे यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 16, 2023 10:49 AM
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधी ‘या’ शहरात पोस्टरबाजी; मविआत धुसफूस?
देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर ‘मविआ’ची दुसरी वज्रमूठ सभा, कोणते नेते लावणार हजेरी?