राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तयारी नेमकी कशी? पाहा…
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी अधिकार्यांकडून घेतली जातेय. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी अधिकार्यांकडून घेतली जातेय. विधानभवनाला रंगरंगोटी करत, झेंडू आणि इतर विविध फुलांची सजावट करण्यात आलीये. यंदाचं अधिवेशन विशेष असेल कारण सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय.त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याची चिन्ह आहेत. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. त्यानंतर होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहाणं महत्वाचं असेल.
Published on: Feb 27, 2023 09:19 AM