विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही शिंदेंचा मोठा दावा, नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित शिंदे म्हणाले…

| Updated on: Feb 28, 2023 | 8:12 AM

उद्धव ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी पहिला वार केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी पहिला वार केला आहे. विधानसभेपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंची विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र दिलं आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात सूचित केलं आहे.एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत प्रतोद नेमण्यासाठी उप सभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिलं आहे. प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर कायम राहील.

Published on: Feb 28, 2023 08:11 AM
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असताना ३ गुन्ह्यांची चर्चा, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी; आजच्या सुनावणीत काय होणार? राज्याचं लक्ष