Maharashtra: 40 मंत्र्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसे चालवणार? - सतेज पाटील

Maharashtra: 40 मंत्र्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसे चालवणार? – सतेज पाटील

| Updated on: Aug 06, 2022 | 1:03 PM

चाळीस मंत्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात न आणणं हे घातक असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे.

मंत्र्यांचे अधिकार सचिवांना  देण्यावरून सतेज पाटील यांनी टीका केली आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर राज्य चालवणं चिंताजनक असल्याचं सतेज पाटील म्हणाले. चाळीस मंत्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीची व्यवस्था अस्तित्वात न आणणं हे घातक असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. त्याची सुनावणी सोमवारी होणार असून या प्रकरणाच्या निर्णयाची शिंदे आणि भाजप सरकार प्रतीक्षा करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे दिसते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु असल्याने मंत्रिपदाच्या याद्या जवळपास निश्चित झाल्याचे काल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर म्हणाले.

Published on: Aug 06, 2022 01:03 PM
Patra Chawl Scam: संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न- सुनील राऊत
Maharashta Cabinet: मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता