मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेची पुढची भूमिका काय?, पाहा…

| Updated on: Mar 16, 2023 | 10:23 AM

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज एमआयएम आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज एमआयएम आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. संस्थान गणपती परिसरात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढण्यावर ठाम आहे. मात्र मोर्चा काढू देणार नसल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. संस्थान गणपती परिसर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भगवामय केला आहे.

Published on: Mar 16, 2023 10:23 AM
कितीही त्रास होत असला तरी…; लाँग मार्च मोर्चातील शेतकऱ्यांची तब्येत बिघडली
4 Minutes 24 Headlines | मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला