मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला; ‘या’ तारखेला रमालल्लाच्या दर्शनाला जाणार

| Updated on: Mar 15, 2023 | 8:02 AM

CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेच्या आमदार खासदारांसह एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या आमदार खासदारांसह एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येतील महंतांनी आमंत्रण दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आता अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. “अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा, अस्मितेचा विषय आहे. अयोध्येतील महंत आले होते. त्यांनी आमंत्रण दिलं आहे. त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून आम्ही लवकरच अयोध्येला जाणार आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

Published on: Mar 15, 2023 08:02 AM
लाल वादळाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सामोरं जावं, आंदोलकाची मागणी
जुन्या पेन्शन योजनेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संप मागे घ्या