गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही – छगन भुजबळ
मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणारे एकनाथ शिंदे गृहमंत्री आग्रही असल्याचे वृत्त त्यामुळे सरकारच पेचात सापडल्याची चर्चा आहे. मात्र महायुतीतील नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महायुतीमधील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावरून एक वक्तव्य केलं आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असून येत्या 5 डिसेंबरला आझाद मैदानावर थपथविधी होणार आहे. अवघे 2 दिवस उरलेत तरी राज्याच्या मुख्यमंत्री कोण, गृहखातं कोणाकडे राहणार, इतर खाती कोणत्या मंत्र्यांना मिळणार याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाहीत. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणारे एकनाथ शिंदे गृहमंत्री आग्रही असल्याचे वृत्त त्यामुळे सरकारच पेचात सापडल्याची चर्चा आहे. मात्र महायुतीतील नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महायुतीमधील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावरून एक वक्तव्य केलं आहे. गृहमंत्री पदावरून कोणताही पेच नाही, त्याच्यावरून काही अडले नाही असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भुवनेश्वरला होते, त्यामुळे काहीच निर्णय होण्यासारखा नव्हता. त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे. प्रत्येक पार्टीची अंतर्गत चर्चा झालेली असते,त्यामुळे हा निर्णयही होईल, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक खातं महत्वाचं आहे, असंही भुजबळ म्हणाले.