Video: गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, बाजारपेठांमध्ये गर्दी

| Updated on: Aug 25, 2022 | 3:03 PM

हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरी केले जातात. मात्र गणेशोत्सव (Ganeshotsav) हा सण अत्यंत महत्वाचा सण असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळामध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा करता आला नाही, मात्र ह्या वर्षी कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्याच्या तयारी मध्ये नागरिक दिसत आहे. गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन […]

हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरी केले जातात. मात्र गणेशोत्सव (Ganeshotsav) हा सण अत्यंत महत्वाचा सण असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळामध्ये गणेशोत्सव थाटामाटात साजरा करता आला नाही, मात्र ह्या वर्षी कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरी करण्याच्या तयारी मध्ये नागरिक दिसत आहे. गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने गणपतीच्या साहित्याने संपूर्ण महाराष्ट्रासह नवी मुंबई शहरातील सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. गणपती बाप्पा च्या सजावटी साठी लागणारे साहित्य बाजारामध्ये उपलब्ध आहे. बाप्पा च्या तयारी साठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची सुरुवात झालेली आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारामध्ये सकाळ संध्याकाळी नागरिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा खुलून दिसत आहेत. कोरोनाच्या संकटामधून बाहेर पडल्या नंतर नागरिकांमधील उत्साह शिगेला पोहचलेला आहे.

Published on: Aug 25, 2022 03:03 PM
Video: आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदेगटाची घोषणाबाजी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी!