विकसित महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात विधान

| Updated on: May 01, 2023 | 10:20 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे.

नागपूर : राज्यभरात आज 63 वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी आपलं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगलं काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेतकरी समृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. तर किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी विविध योजना सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.

Published on: May 01, 2023 10:20 AM
मुंबईच्या बीकेसी येथे वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात, बघा ‘मविआ’चं शक्तीप्रदर्शन
अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची बंद दाराआड खलबतं, कशावर झाली चर्चा?