‘महाराष्ट्र दिनी’ राज्यपाल रमेश बैस यांनी कोणती केली मोठी घोषणा
शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई : आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येत आहे. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र्य महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्यानिमित्त 1 मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याचनिमित्ताने आज शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही घोषणा देखिल केल्या. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषकाचे यावर्षी 350 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येईल. तर तसेच किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारीत संग्रहालय केलं जाईल. त्याचबरोबर 2 ते 9 जून 2023 या आठवड्यात शिवराज्य महोत्सव आयोजित करण्याची घोषणा राज्यपाल बैस यांनी केली. राज्याच्या ६३ व्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.