VIDEO | …पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये, Sambhaji Raje यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं खरमरीत पत्र

| Updated on: Mar 06, 2023 | 2:57 PM

महाराष्ट्र एकीकरण समितीनं संभाजीराजे यांना एक खरमरीत पत्र लिहलं आहे, ज्यात समितीनं नाराजी व्यक्त करत सीमाभागात मराठी माणूस लडतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये अशी विनंती केली आहे.

बेळगाव : बेळगावातील राजहंसगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हजेरी लावली होती. त्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीनं संभाजीराजे यांना एक खरमरीत पत्र लिहलं आहे. त्याचबरोबर ज्या छत्रपतीचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लडतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संभाजीराजे छत्रपतीकडें नाराजी व्यक्त करण्यात आली असून छत्रपतींचे वारस म्हणून तुम्ही आमच्यासोबत आहात असं आम्ही मानत होतो. पण तुम्ही आमच्या या समजाला हारताळ फासला. असेही या पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हे पत्र लिहिलं आहे

Published on: Mar 06, 2023 02:57 PM
उद्धव ठाकरे खरं-खरं सांगा ते बंगले का पाडले? किरीट सोमय्या यांचा खरमरीत सवाल
‘एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना आवर घातला पाहिजे’, कुणी दिला मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला