Video : नोकरदार महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; नव्या योजनेची घोषणा

| Updated on: Mar 09, 2023 | 3:27 PM

‘शक्तीसदन’ या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवांचा समावेश आहे. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करण्यात येणार आहेत.

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातोय. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं बजेट सादर करत आहेत. यात नोकरदार महिलांसाठी महत्वाची योजना जाहीर केली गेली आहे. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे बांधण्यात येणार आहेत. ‘शक्तीसदन’ ही नवी योजना राज्य सरकारने आणली आहे. दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना तयार करण्यात आली आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.

Published on: Mar 09, 2023 03:27 PM
पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा, एसटी प्रवासात 50 टक्के सूट आणि लवकरच…
शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात गड-किल्ले संवर्धनासाठी किती कोटींची तरतूद, काय केली घोषणा