सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस; 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

| Updated on: Mar 16, 2023 | 10:06 AM

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागच्या दोन दिवसापासून या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने संपकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडली आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा ससून रुग्णालयाला फटका बसला आहे. ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नर्सेस यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावं, असं आवाहन ससून अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी केलं आहे.

Published on: Mar 16, 2023 10:05 AM
कितीही त्रास होत असला तरी…; लाँग मार्च मोर्चातील शेतकऱ्यांची तब्येत बिघडली
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेची पुढची भूमिका काय?, पाहा…