धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा आरोप

| Updated on: Nov 16, 2024 | 4:00 PM

महाराष्ट्रात विधानसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरु आहे. महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात मोठ्या सभा झालेल्या आहेत.

गौतम अदानी यांना धारावीची जमीन देण्यासाठी भाजपाने महाराष्ट्रातील सरकार  अक्षरश:  चोरलं असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी- शाह आणि अदानी यांनी बैठकीत आमदार खरेदीचा निर्णय घेतला असाही आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानी यांना देण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारची चोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रात आमदारांची खरेदी करुन महाराष्ट्रातील सरकार पाडले जात होते. त्यावेळी नरेंद्र मोदी संविधानाची रक्षण करीत होते का असाही सवाल राहुल गांधी यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

 

Published on: Nov 16, 2024 04:00 PM
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले…